Sunday, March 8, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरKitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग

Kitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग

स्वयंपाक बनवताना महिला पदार्थांमध्ये काही ना काही तरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्या काही क्लृप्त्या लढवितात. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –

  • सुरळीच्या वड्या करताना पीठ मिक्सरमध्ये फिरवून, कुकरमधून शिजवून घ्या आणि नंतर कडाप्प्याच्या ओट्यावर पसरून घ्यावे. वड्या खुसखुशीत व रुचकर लागतात.
  • डोसा करताना निर्लेपचा तवा नसेल, तर लोखंडी तवा तापत ठेवा. तापल्यावर बटाटा कापून तव्यावर फिरवावा, डोसा न चिकटता निघतो. प्रत्येक डोसा करताना बटाटा तव्यावर फिरवावा लागतो.
  • घरात पातळ पोहे नेहमी आणून ठेवावेत. चिवडा, दडपे पोहे, दूध पोहे, गूळ – खोबरं – पोहे या प्रकारांखेरीज इतर अनेक पदार्थ चांगले होण्यासाठी किंवा बिघडलेले पदार्थ दुरुस्त करण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. एक मूठ पोह्याची करामत पाहा. इडलीचे पीठ करण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालताना एक मूठ पातळ पोहे त्यात घालून बघा; इडली हलकी आणि पांढरी होते. पुरण करताना अनेकदा ते पातळ राहते, पटकन आळत नाही. अशा वेळी पुरण गॅसवरून खाली उतरवून एक मूठ पोहे घाला आणि ढवळून थोडा वेळ ठेवा. पुरण घट्ट होण्यास मदत होते.

हेही वाचा – Kitchen Tips : पौष्टिक नूडल्स, चटपटीत शेवेची भाजी अन् मिरिंडा केक…

  • गोडी किंवा खारी शंकरपाळी करताना, पोळी लाटल्यावर त्यावर सर्व बाजूंनी तूप लावावे आणि त्यावर थोडे कॉर्नफ्लॉवर भुरभुरावे. नंतर दोन घड्या घालून पोळी लाटावी. शंकरपाळी कापून तळावीत. छान पापुद्रे सुटतात. तसे साटा (तांदळाचे पीठ + तूप) लावूनही पापुद्रे सुटतात; परंतु दरवेळी तांदळाचे पीठ तयार असतेच असे नाही आणि उरलेल्या साट्याचे काय, असा प्रश्नही राहतोच. त्यापेक्षा कॉर्नफ्लोअर हवे तेवढेच वापरता येते आणि ते नेहमी मिळू शकते.
  • चकल्या करताना त्यात तेल किंवा लोणी घालतात. त्याऐवजी एक नारळाची वाटी खरवडून ते खोबरे थोडे पाणी घालून मिक्सरमधून चांगले बारीक करावे. जेवढे पीठ असेल तेवढेच नारळाचे दूध धरून पाणी एका पातेल्यात गरम करण्यास ठेवावे, त्यात आवडीप्रमाणे तिखट, ओवा घालावा. मग मीठ घालून पातेले गॅसवरून उतरवून सारखे करावे. एकजीव झाल्यावर झाकून ठेवावे. एक-दीड तासाने पीठ मळून चकल्या कराव्यात. लोणी, तेल न घालताच चकल्या खुसखुशीत आणि चवदार होतात.

हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…

  • केक भाजताना काही वेळा तळाचा भाग करपतो. केक पालथा करून तेवढाच भाग नीट कापून घ्यावा. उरलेल्या केकवर साखर भुरभुरावी. पुन्हा पाच मिनिटे ओव्हनमध्ये भाजावा. ब्राऊन रंग आल्यावर काढावा.

(‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!