Tuesday, March 10, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 11 नोव्हेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 11 नोव्हेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 11 नोव्हेंबर 2025; वार : मंगळवार
  • भारतीय सौर :  20 कार्तिक शके 1947; तिथि : सप्तमी 23:08; नक्षत्र : पुष्य 18:17
  • योग : शुभ 09:43; करण : विष्टी 11:33
  • सूर्य : तुळ; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:42; सूर्यास्त : 18:01
  • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – सगळ्याच व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा. कुटुंबातील सदस्य मदत करतील, त्यामुळे आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल. एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे खरेदी करू शकता. व्यवसाय आणि व्यावसायिक परिस्थिती अनुकूल असेल. पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी कामात फायदा होईल. रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता वाढेल.

वृषभ – व्यवसायाची स्थिती साधारणच राहील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस जरा नकारात्मक परिणाम देणारा असेल. मित्रांसोबत व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे उत्तम. आजच्या सुखसोयी उद्या उपलब्ध नसतील, म्हणून त्यांचा आजच लाभ घ्या. शुभ कार्यक्रमांवर खर्च होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन – कार्यालयीन कामात काही गुंतागुंत निर्माण होईल. आज इतरांच्या मदतीने तुमची कामे पूर्ण कराल. व्यवसायात वृद्धी होईल. तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढेल. शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ शकते. मित्रांकडे दुर्लक्ष करणे अयोग्य ठरेल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. पाहुण्यांचे आगमन होईल.

कर्क – बुद्धिमत्ता, शक्ती आणि धैर्य यांच्यामुळे यशस्वी व्हाल. व्यवसाय वाढेल आणि नफा होईल. तुम्ही आर्थिक लाभ मिळवू शकाल. कार्यालयीन कामात समाधानकारक यश मिळेल, वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुम्ही चांगल्या कामाचा मार्ग मोकळा कराल. व्यावसायिक सहली यशस्वी होतील.

सिंह – एखाद्या कामात मनाजोगता फायदा होईल. सल्ला किंवा परिस्थिती काहीही असो, तुम्हाला सर्वांकडून पाठिंबा मिळेल. मात्र स्वत:चे काम पूर्ण करण्याकडे लक्ष ठेवा. तुमचा सौम्य स्वभाव सहाय्यभूत ठरेल. तुमच्या धार्मिक श्रद्धा फलदायी ठरतील. जुन्या मित्रांना भेटाल. जोडीदाराशी तुमचे नाते अधिक सौहार्दपूर्ण होईल. संततीशी संबंधित समस्या संपतील.

हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटासाठी मुक्त व्यवसाय

कन्या – सध्याचा काळ नकारात्मक आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी, कामावर लक्ष केंद्रित करा. कामात सावधगिरी बाळगा, विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी होणारे प्रवास तूर्तास पुढे ढकला. व्यवसायातील अडथळे कायम राहतील. एकमेव दिलासा देणारी बाब म्हणजे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

तुळ – कामाच्या ठिकाणी प्रगतीत अडथळा जाणवेल. चालू परिस्थिती काळजीपूर्वक हाताळा. निराश होऊ नका; काळ हे उत्तम औषध आहे. व्यवसायातील अडथळे मानसिक अशांतता निर्माण करतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. शत्रूंची भीती, संततीबद्दलची चिंता आणि वायफळ खर्च यामुळे त्रासलेले असाल. कौटुंबिक समस्या वाढतील.

वृश्चिक – कुटुंबात शुभ कार्यक्रम होतील. राज्य सन्मान मिळण्याची शक्यता आहे. शांततेने काम करा. जीवन मौल्यवान आहे, त्यामुळे गाडी चालवताना काळजी घ्या. तुमचे काम स्वतः करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. वैवाहिक जीवनात एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढेल. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक समंजसपणाचे होईल.

धनु – घर आणि व्यवसाय एकमेकांपासून वेगळे ठेवा. नवीन लोकांना भेटणे फायदेशीर ठरेल. व्यावसायिक संबंधांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. कामावर तुमचा कष्टाळूपणा फायदेशीर ठरेल. आत्मविश्वासामुळे कामांमध्ये यश मिळेल. तुम्हाला एखादी आवडती वस्तू, नवीन कपडे, दागिने भेट मिळू शकतात.

मकर – आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कोणाला पैसे उधार देण्याचे शक्यतो टाळा. भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. संभाषणात संयम ठेवा. मानसिक अस्वस्थता आणि  मुलांशी संबंधित समस्या तुमच्या त्रासात भरच टाकतील. पालकांचे बिघडणारे आरोग्यही चिंता निर्माण करेल. कला क्षेत्रातील लोकांना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल.

कुंभ – आर्थिक परिस्थिती चांगली करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहाल. आर्थिक योजना फलदायी ठरतील. येणाऱ्या संधींचा फायदा घ्या. सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल. थकीत येणे वसूल होण्याची शक्यता आहे. जुने वाद संपतील. पत्नी, मुले आणि मित्रांच्या सोबतीने आनंद वाढेल. विद्यार्थ्यांसाठी  वेळ अनुकूल असेल.

हेही वाचा – …अन् व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘क्राइम’ने मुक्त केलं!

मीन – लांबचा प्रवास आणि आव्हानात्मक कामे पार पाडावी लागू शकतात. व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाची परीक्षा घेतली जाईल. तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. काही सामाजिक कार्यामुळे आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. आज आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

दिनविशेष

प्रसिद्ध शाहीर पठ्ठे बापूराव

टीम अवांतर

श्रीधर कृष्ण कुलकर्णी म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध शाहीर पठ्ठे बापूराव यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1866 रोजी हरणाक्ष रेठरे (तालुका वाळवे, जिल्हा सांगली) या गावी झाला. शिक्षण इंग्रजी चार-पाच इयत्तांपर्यंत झालेल्या श्रीधररावांनी तमाशाच्या आवडीमुळे स्वतःचा  फड उभारला आणि त्यात स्वरचित लावण्या आणि कवने पठ्ठे बापूराव या नावाने सादर करू लागले. आजचा पैसा उद्या पाहायचा नाही आजची लावणी उद्या गायची नाही, या तत्वाशी एकनिष्ठ असणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव यांनी स्वत:चे काव्य आणि पहाड़ी आवाज या जोरावर तमाशाला नवे वळण दिले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या इत्यादी 2 लाखांहून अधिक लावण्या लिहिलेल्या आहेत. त्यातील काही तीन भागांत प्रसिद्ध झाल्या आहेत (1958). तथापि, त्यांच्या बऱ्याचशा रचना अनुपलब्ध आहेत. बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायिल्या जातात आणि सगळे तमासगीर त्यांना पूज्य मानतात. त्यांच्या फडात पवळा नावाची एक सुंदर स्त्री होती. मात्र पुढे तिने फड सोडल्यानंतर त्यांचा तमाशाचा व्यवसाय हळूहळू ढासळत गेला. आयुष्याच्या शेवटी विपन्नावस्थेत त्यांना दिवस कंठावे लागले. 22 डिसेंबर 1945 रोजी त्यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!